आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनानंतर ज्येष्ठ प्रवाशांची संख्या निम्म्याने रोडावली असून मे 2019 व मे 2022 च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. तसेच 1 जुलैपासून एसटी महामंडळ स्मार्टकार्डची सक्ती करणार आहे. त्यामुळे या वयोगटातील प्रवासी संख्येवर अजून परिणाम होणार आहेत.
मे 2019 मध्ये 22 लाख 77 हजार 47 तर मे 2022 मध्ये 10 लाख 65 हजार 353 प्रवाशांनी सवलतीच्या दरात प्रवास केला आहे. ही संख्या 2019 पेक्षा निम्म्यापेक्षाही कमी आहे.
कोरोनापूर्वी नवीन स्मार्टकार्डसह ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 हजार किलोमीटर सवलतीच्या दराची प्रवासाची योजना सुरू करण्यात आली. मात्र, ही योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. स्मार्टकार्ड काढण्यासाठी देखील अनेकदा मुदतवाढ देण्यात आली.
मात्र, आता 1 जुलैपासून स्मार्टकार्ड नसणाऱ्यांना पूर्ण तिकीट लागणार असले तरी जुन्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन) मशीनमुळे वाहक केवळ स्मार्टकार्ड पाहूनच ज्येष्ठांकडून पैसे घेत आहे. कार्ड रीड होत नसल्याने वाहक ज्येष्ठांडून केवळ सवलत मूल्याचे पैसे घेऊन तिकीट देते. स्मार्टकार्डची सक्ती, कोरोना, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची कमी झालेली संख्या आदी कारणांनी कोरोनापूर्वी निम्म्याने ज्येष्ठ नागरिकांचा प्रवासाकडे कल दिसून येतो.
2022 व 2019 या वर्षातील मे महिन्याची तुलना
नवीन ईटीआयएम मशीन
सध्या वाहकांकडे ट्रायमॅक्स कंपनीचे मुदत संपलेले ईटीआयएम मशीन आहेत. या कंपनीचा करार संपला असला तरी कंपनीकडून ५ हजार ईटीआयएम मशीन वाहकांच्या हाती देण्यात येत आहे. यातील काही विभागांना मशीनचे वाटप झाले आहे. लवकरच यातील काही मशीन इतर विभागांना वाटप करण्यात येतील. तसेच नवीन टेंडर काढून या मशीनबाबत लवकरच करार करण्यात येईल.- (शेखर चेन्ने, एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.