आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाचा फटका:जिना कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू, 3 महिन्यांपूर्वीच झाले होते बांधकाम

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
 यशवंत मांगो वाघ (वय ७०, रा. देवपिंप्री वसाहत) असे मृत वृद्धाचे नाव आहे. - Divya Marathi
 यशवंत मांगो वाघ (वय ७०, रा. देवपिंप्री वसाहत) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसात घरात जिना कोसळल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे 3 महिन्यांपूर्वीच या जिन्याचे बांधकाम झाले होते आणि पहिल्याच पावसात तो कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यशवंत मांगो वाघ (वय ७०, रा. देवपिंप्री वसाहत) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

3 महिन्यांपूर्वीच वाघ कुटंबीयांनी देवपिंप्री वसाहतीत नवीन घर बांधले होते. रविवारी रात्री नऊ वाजता मुसळधार पाऊस, वादळ सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर असलेले साहित्य आणण्यासाठी वाघ जिन्यावर चढले. वादळाचा जोर वाढत असल्याने काही सेकंदातच सिमेंटचा जिना कोसळला. यात वाघ यांचे पाेट, कंबरेवर जबर दुखापत झाली. ते जिन्याखाली दाबले गेले होते.

घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी वाघ यांना नेरी येथील रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर रात्रीच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत वाघ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...