आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल:वृद्धेची दिशाभूल करुन सोन्याची पोत लांबवली ; ग्रामीण भागात लुटणारे चोरटे शहरात शिरले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वीच जळके-विटनेर रस्त्यावर वृद्धास थापा मारुन दोन तोतया पोलिसांनी त्यांचे १ लाख २६ हजार रुपयांचे सोने लुटले होते. तर बुधवारी दुपारी जळगाव शहरात पोलिस अधीक्षक कार्यालयापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एलआयसी ऑफिसजवळ अशाच पद्धतीने दोन भामट्यांनी वृद्धेची दिशाभूल करुन तिच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपयांची सोन्याची मंगलपोत लंपास केली. सकुबाई संतोष वनारसे (वय ६५, रा. नाचणखेडा, ता. जामनेर) असे वृद्धेचे नाव आहे. सकुबाई यांच्या शेजारी राहणारी आजारी मुलगी जळगावात रुग्णालयात दाखल असल्यामुळे तिला पाहण्यासाठी त्या जळगावात आल्या होत्या. एलआयसी ऑफीसजवळून पायी चालत असताना दुचाकीवरुन दोन भामटे त्यांच्याजवळ आले. महादेव मंदिर कुठे आहे? अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर तुम्हाला कुठे जायचे आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो, या भागात चोऱ्या जास्त वाढल्या आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घ्या असे सांगत त्यांनी महिलेला कागद दिला. त्यांच्यावर विश्वास ठेऊन सकुबाई यांनी गळ्यातील मंगलपोत काढून कागदात ठेवली. कागदात मंगलपोत ठेवत असताना दोघांनी सकुबाई यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. सेकंदातच दोघे भामटे मंगलपोत घेवून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर सकुबाई यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेची झाली पुनरावृत्ती गेल्या दोन दिवसांपूर्वी श्यामराव तायडे यांना देखील अशाच पद्धतीने बोलणे करुन, गुंतवून दोघांनी त्यांचे सोने लंपास केल्याची घटना जळके-विटनेर येथे घडली होती. ग्रामीण भागात नागरिकांना लुटणारे चाेरटे शहरात शिरल्याचे यातून स्पष्ट होत असून नागरीक धास्तावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...