आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेव सूत्र:मला नाउमेद करण्याचे विरोधकांकडून एकमेव सूत्र

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडसेंना नाउमेद केल्याशिवाय यश मिळणार नाही हे विरोधकांना माहिती आहे. जिल्हा बँक, दूध संघात त्यांना अपयश आले. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकवटून विरोध करण्याचे एकमेव सूत्र ठेवल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा कार्यालयासमोर लाडू व वहीतुला करण्यात आली. तत्पूर्वी निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांच्या पत्रावर प्रशासक मंडळ तसेच चौकशी समिती नेमली. त्याविरुद्ध खंडपीठाने संचालकांच्या हाती कारभार दिला. पुढच्या काळातही विरोधकांचा चौकशी करण्याचा, दूध संघ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अपप्रचारावर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवणार नाही. आता तरी पालकमंत्री नेमावे, गावागावापर्यंत जावे, अशी विघ्नहर्त्याने सद्बुध्दी द्यावी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होईल, अशी मुख्यमंत्र्यांना भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री नियुक्ती लांबली असावी, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...