आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआेव्हरटेक करणाऱ्या ट्रीपलसीट दुचाकीस्वारांना वाचवताना समोरून येणाऱ्या बसची धडक लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाेन जण जखमी झाले आहे. यातील एक गंभीर असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दुसऱ्या जखमीवर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी १०.४५ वा. टीव्ही टाॅवरजवळ घडला.
पाळधी येथे मित्राच्या लग्नासाठी नाडगाव (ता. बोदवड) येथील कडू बाविस्कर (वय २७), भुरा बाळू राजपूत व अन्य एक जण माेटारसायकलने (क्र. एमएच १२- जीक्यू ५४७) रविवारी सकाळी निघाले. कडू हा दुचाकी चालवत हाेता. टीव्ही टॉवरजवळ आेव्हरटेक करताना जळगावहून भुसावळकडे जाणारी भरधाव बस (क्र. एमएच १४ बीटी ००९८) समाेर आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला उतरली. प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली तर दुचाकीस्वार कडू बावस्कर व भुरा राजपूत जखमी झाले आहेत.
वृद्धेचे पाकीट हरवले : अपघातात बसमधील उषाबाई मधुकर धनगर (रा. बांभाेरी) या वृद्धेचे पाकीट गहाळ झाले. ती जळगावहून भुसावळला नातेवाइकांकडे निघाली हाेती. अपघात झाल्यानंतर ती नशिराबादहून घटनास्थळी परत आली. पाकिटात १ हजार रुपये राेख, आधारकार्ड हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.