आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणास मानसिक त्रास देण्यासाठी एका व्यक्तीने विचित्र प्रकार अवलंबला. हा व्यक्ती थेट तरुणाचा बनावट ई-मेल आयडी तयार करून त्या माध्यमातून विविध ऑनलाइन शॉपिंग अॅपवर महिलांचे अंतर्वस्त्र खरेदी करतो आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसाठी तरुणाच्या घराचा पत्ता देतो आहे. त्यामुळे तरुणाच्या घरी डिलेव्हरी बॉय येत आहे. काही वस्तू सोडवल्या असता त्यात अंतर्वस्त्र मिळून आली. जी तरुणाने ऑर्डर केलेली नव्हती.
सहा जून रोजी पहिले पार्सल तरुणाच्या घरी आले. यानंतर दररोज एक-दोन पार्सल येऊ लागले. या प्रत्येक पार्सलमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र असल्याने तरुणासह त्याचे कुटूंबीय चकीत झाले. आपण कोणत्याही प्रकारची ऑनलाइन खरेदी करीत नसताना पार्सल काय येत आहेत? याचा तपास तरुणाने घेतला. या वेळी त्याच्या नावाचा बनावट ई-मेल आयडीवरून कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असल्याचे आढळून आले. तरुणाने मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.