आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल वाटप:पायपीट थांबणार; ४० विद्यार्थिनींना  तीन वर्षांसाठी मिळाल्या सायकली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावातील एसएनडीटी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत ४० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. या योजनेसाठी काही प्रमाणात शासनाकडून अनुदान, शिक्षकांनी दरवर्षी प्रत्येकी १५०० रुपयेप्रमाणे गाेळा केलेला निधी व रोटरी क्लबच्या मदतीने या सायकली उपलब्ध झाल्या आहेत.

तीन वर्षांनंतर करतात जमा
तीन वर्षांसाठी या सायकली वाटप केल्या जातात. यानंतर पुन्हा महाविद्यालयाकडे जमा कराव्या लागतात. सायकलींची दुरुस्ती करून पुन्हा प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल दिली जाते. दरम्यान, या सायकल वाटपप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, संस्थाध्यक्ष व्ही.पी. चौधरी, प्राचार्या जयश्री नेमाडे, सतीश जाधव, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...