आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांचा दावा:महात्मा फुले मार्केटची जागा कायम मनपाच्या मालकीची ; ब-सत्ता प्रकार रद्दसाठी नऊ वर्षांपूर्वी पत्र

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट असलेल्या जागेच्या मालकीवरून महसूल व नगरविकास विभागात पुन्हा दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर महापालिकेने पाठवलेल्या उत्तरात फुले मार्केट असलेली जागा महापालिकेच्या कायमस्वरूपी मालकीची असल्याचे म्हटले आहे. जागेच्या मिळकत पत्रिकेवरील ब-सत्ता प्रकार रद्द करण्यासाठी २०१३मध्ये पत्र दिल्याची आठवण करून दिली आहे.

महापालिकेच्या व्यापारी संकुलाचा मुद्दा एेरणीवर आला आहे. मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्राेत असतानाही गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळ्याचंा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. गेल्या वर्षी १२ मे २०२१ राेजी झालेल्या महासभेत मुदत संपलेल्या गाळ्यांचे नूतनीकरण अथवा लिलाव करण्याचा ठराव मंजूर झाला हाेता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मनपाचे दीडशे काेटींपेक्षा जास्त उत्पन्न थकले आहे. राज्य शासन याकडे लक्ष न देता मार्केटच्या जागेविषयी विचारणा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मनपा आयुक्त देविदास पवार यांनी पाठवलेल्या उत्तरात सडेताेड उत्तर देण्यात आले आहे.

मनपाचा जागेच्या मालकीवर दावा मनपा हद्दीतील सि.स.नं.१९३८/३७ -ब/१ ही जागा ब-सत्ता प्रकार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नाेटीस देऊन कळवले हाेते. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दाखल याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नाेटिसीला स्थगिती दिली आहे. त्यानंतरही महसूलकडून जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनपाला विचारणा हाेत आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त पवार यांनी महसूल शाखेला पाठवलेल्या पत्रात फुले मार्केट असलेली जागा मनपाच्या कायमस्वरूपी मालकीची असल्याचे स्पष्ट केले आहे. जागेच्या मिळकत पत्रिकेवरील ब-सत्ता प्रकार रद्द करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना २८ जानेवारी २०१३ राेजी पत्र देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...