आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:आत्महत्या रोखण्यासाठी पोलिस दल आता सुरू करणार हेल्पलाइन, ग्रामीण भागात 72 ते 75%, शहरात 25 ते 28% आत्महत्या

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमध्ये आत्महत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. ३१ ते ४५ या वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच १ हजार १०७ तरुणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस दल ‘भरोसा सेल’ अंतर्गत हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी ११२ या पोलिस मदत क्रमांकावर फोन करून मदत घ्यावी, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलिस दल व श्री संतुलन कौन्सिलिंग सेंटरचे रागीब अहमद यांनी सन २०१८ ते २०२१ या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या आत्महत्येच्या घटनांवर सखाेल अभ्यास केला. यात २०१८ ते २०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ९७५ जणांनी आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले आहे. हा काळ कोरोनाच्या लॉकडाऊनचा असल्याचे दिसून आले. आत्महत्येत सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, ३१ ते ४५ या वयोगटातील सुमारे ११०७ तरुणांनी आत्महत्या केल्याचे अभ्यासाअंती समोर आले. पोलिस हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन व उपचाराने आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जाईल असे मुंढे म्हणाले.

चार वर्षांत २,९७५ आत्महत्या

लॉकडाऊनचा असल्याचे दिसून आले. आत्महत्येत सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, ३१ ते ४५ या वयोगटातील सुमारे ११०७ तरुणांनी आत्महत्या केल्याचे अभ्यासाअंती समोर आले. पोलिस हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन व उपचाराने आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जाईल असे मुंढे म्हणाले.

आत्महत्येची मुख्य कारणे
रागाच्या भरात, व्यसनाधीनतेमुळे, शारीरिक आजाराला कंटाळून, कर्जबाजारी, आर्थिक अडचणी, मानसिक आजार, नैराश्य, कौटुंबिक कलह, वेळेत लग्न न होणे तसेच कारण समोर न येणे ही आत्महत्येची कारणे असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी ११ तर सर्वाधिक ९१ वर्षाच्या वृद्धाने आत्महत्या केल्याची दोन प्रकरण आहेत. ही माहिती अहमद यांनी दिली.

पुरुषांच्या आत्महत्या जास्त
आत्महत्या करणाऱ्यांत महिलांचे प्रमाण हे १७ ते २० टक्के तर पुरुषांचे प्रमाण हे ८० ते ८४ टक्क्यांपर्यंत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात चार वर्षांत २ हजार ९७५ जणांनी आत्महत्या केल्या. यातील ३१ ते ४५ वयोगटाीतल १ हजार ७ जणांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रमाण कोरोनाच्या काळात वाढले.

बातम्या आणखी आहेत...