आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे नियाेजन:दूध संघाच्या राजकीय घडामाेडींना मुंबईत वेग

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून ३ नाेव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. गेल्या दाेन दिवसांमध्ये प्राथमिक बैठका आटाेपल्यानंतर मुंबईत संघाच्या निवडणुकीचे नियाेजन केले जात आहे. यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून राजकीय घडामाेंडीना वेग दिला जात आहे.

गेल्या वर्षीच सत्ता नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बंॅकेची निवडणूक बहिष्कार टाकून अर्ध्यावर साेडण्याची नामुष्की आेढवल्याने संकटमाेचक असलेल्या गिरीश महाजनांवर पक्षांतर्गत नाराजीही हाेती. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मंत्री महाजन यांनी या वेळी सत्ता आल्याने दूध संघासाठी तयारी सुरू केली आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा बंॅकेपाठाेपाठ दूध संघाच्या प्रशासक नियुक्तीच्या न्यायालयीन लढत्या देखील भाजपला ताेंडघशी पाडले हाेते. या दुहेरी पराभवामुळे भाजपकडून ही निवडणूक गांभीर्याने घेण्यात आली आल्याचे चित्र आहे.

यासाठी थेट मुंबईतून सूत्रे हलवली जात आहेत. भाजप-शिंदेसेनेच्या उमेदवारांसाेबत अन्य पक्षातील उमेदवारांशी भाजपकडून संपर्क साधला जात आहे. साेमवारी भाजपकडून दूध संघाच्या निवडणुकीसाठी बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी दूध संघासंदर्भातच बैठक घेतली.

बातम्या आणखी आहेत...