आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:आज मृगसरी कोसळण्याची शक्यता; तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ९ ते ११ जून दरम्यान मृगसरी कोसळणार आहेत. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातदेखील वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात ९ जून रोजी ५ मिली मीटरपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. १० जून रोजी १८ तर ११ जून रोजी १० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेगही १८ ते २१ किमी दरम्यान राहणार आहे. या काळात आर्द्रता सकाळी ७० टक्क्यापर्यंत तर दुपारी ३० टक्यापर्यंत राहू शकते. तापमान पुन्हा चाळिशीत : गेल्या चार दिवसांमध्ये वाढलेले तापमान पुन्हा खाली येत आहे. ४३ अंशांपर्यंत गेलेला पारा पुन्हा खाली उतरला आहे. ८ जून रोजी जिल्ह्यात ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. किमान तापमान देखील २७ अंशापर्यंत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...