आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेन्याच्या भावात घसरण:साेन्याच्या दरात महिनाभरात प्रति‎ ताेळा तीन हजार रुपयांची घसरण‎

जळगाव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात अमेरिकन बँकेसह भारत व‎ जगभरातील प्रमुख देशांनी साेने खरेदी‎ वाढवल्याने साेन्याचे दर ६० हजार रुपये प्रती‎ ताेळ्यापर्यंत पाेहाेचले हाेते; परंतु आंतरराष्ट्रीय‎ जगतात स्थिरता आल्याने साेन्याच्या दरात‎ फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात प्रति ताेळा‎ तीन हजार रुपयांची घसरण झाली.‎ फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय घडामाेडींसह‎ केंद्रीय अर्थसंकल्प दरम्यान साेन्याचे प्रति‎ ताेळा ५८,८०० जीएसटीसह ६० हजारांवर गेले‎ हाेते.

तर शुक्रवारी ते ५६,१०० एवढे भाव‎ खाली आले हाेते. गेल्या महिन्याच्या तुलनेत‎ आता साेन्याच्या भावात घसरण झाल्याने‎ त्याचा लाभ घेण्यासाठी बाजारपेठेत‎ ग्राहकांची पावलं वळली आहेत. सध्या सुरू‎ असलेली साेने खरेदी ही आगामी एप्रिल मे‎ महिन्यात असलेल्या मुहूर्तांसाठीचीच खरेदी‎ असल्याचे सराफा व्यावसायिक सांगतात.‎

बातम्या आणखी आहेत...