आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर:चांदीचे भाव 70 हजार रु. किलाेवर पाेहाेचले ; एकाच दिवसांत तब्बल 1900 रुपयांची वाढ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चांदीच्या दरात सातत्याने वाढ हाेत आहे. मंगळवारी चांदीचे प्रति किलाेचे दर उच्चांकी ७० हजार रुपयांवर पाेहाेचले. एका दिवसातील १९०० रुपयांची तर महिन्याभरात तब्बल सहा हजार रुपयांची वाढ नाेंदवली गेली आहे. साेमवारी संध्याकाळी चांदीचे दर प्रति किलाेला ६८१०० हाेते. ते मंगळवारी सकाळी ६९७२२ झाले. तर दुपारून ते ७० हजार रुपये किलाेवर पाेहाेचले. सुमारे महिन्याभरापूर्वी (५ डिसेंबर) चांदी प्रतिकिलाे ६४ हजार रुपये हाेती.

त्यात सहा हजारांची वाढ हाेऊन मंगळवारी ते ७० हजार रुपये प्रती किलाेवर पाेहाेचले. आंतरराष्ट्रीय साेने बाजारात जगभरातील प्रमुख बँकांकडून साेन्याची खरेदीत वाढ झाल्याने साेन्याच्या दरात वाढ हाेत आहे. तर चीनकडून इलेक्ट्राॅनिक्स उत्पादनासाठी चांदीची मागणी वाढली असल्याने दरात माेठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. भारताचा रुपया इतर देशाच्या तुलनेत मजबूत आहे. भारतीय ग्राहकांकडून साेन्याच्या दरात वाढ हाेत असल्याने चांदीची मागणी वाढती आहे. परिणामी दरात वाढ झाल्याचे व्यावसायिक रामू साेनी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...