आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेहरूण तलावात िशरणारे सांडपाणी राेखण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पाला प्रतिसाद मिळत नसल्याने विषय मागे पडला आहे. त्याला पर्याय म्हणून थेट तलावाच्या मध्य भागातून सांडव्यापर्यंत पाइपलाइन टाकून सांडपाणी वाहून नेण्याचे विचाराधीन आहे. या संदर्भात दाेन्ही मंत्री, आमदार व मनपातील लाेकप्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मेहरूण तलावात परिसरातील सांडपाणी वाहून येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. या संदर्भात मनपाने आॅगस्ट महिन्यात सर्वेक्षण केले हाेते. त्यात शिरसाेलीराेड व माेहाडीराेड परिसरातील अकरा सर्व्हेमधून सांडपाणी तलावात जात असल्याचे निष्पन्न झाले हाेते. यावर पर्याय म्हणून सांडपाणी जमिनीत जिरवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया , तलावाच्या काठावर भुयारी गटार उभारण्यावर विचार सुरू हाेता.
तलावात पाण्याखालून पाइपलाइनची तयारी
तलावात तीन ठिकाणी सांडपाणी शिरते. त्यामुळे सांडपाणी एकाच ठिकाणी आणले जाणार आहे. त्या ठिकाणावरून तलावाच्या मध्य भागातून पाण्याखाली पाइपलाइन टाकून त्यातून सांडव्यापर्यंत सांडपाणी वाहून नेण्यात येणार आहे. यासंदर्भात पाण्याखाली जलवाहिनी टाकण्याचा अनुभव असलेल्या जैन इरिगेशन कंपनीशी चर्चा झाली आहे. या कंपनीच्या माध्यमातून हे काम करण्याचे नियाेजन सुरू आहे. कंपन्यांचा सीएसआर फंडाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. तलावातून पाइपलाइन टाकण्याचा अंतिम निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आमदार सुरेश भाेळे, महापाैर जयश्री महाजन व मनपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाणार असल्याच्या वृत्ताला आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांनी दुजाेरा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.