आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी अधिकारी शाळांना भेटी देत आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पालक संपर्क अभियानाचा चौथा टप्पा नुकताच राबवण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यातील चाळीसहून अधिक शाळांना भेटी देण्यात आल्या.
यात अमळनेर येथील नांद्री जिल्हा परिषद शाळेला उपस्थिती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या तर धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे विद्यार्थ्यांना वाचनात अडचणी येत असल्याने या शाळेला गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहे. दर महिन्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख आणि तालुकास्तरी यंत्रणा कमी गुणवत्ता असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देतात.
डिसेंबर महिन्यातही अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.या भेटींचा अहवाल नुकताच सादर झाला असून, यात शाळांना देण्यात आलेल्या सूचना मांडण्यात आल्या आहे. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसहून अधिक शाळांना पंधरा अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकांनी भेटी दिल्या.
यात अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, रावेरसह सर्वच तालुक्यातील जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यात वाचन, लेखन, गणित आदींबाबत प्रश्न विचारण्यात आले. यात गेल्या दोन भेटींच्या तुलनेत यंदा प्रगतीत वाढ झालेली दिसून आली तर काही तालुक्यांमध्ये मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ दिसून आली. गुणवत्ता न वाढलेल्या शाळांना महिनाभराचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
पथकाच्या पाहणीनंतर अहवालात हे नोंदवले निष्कर्ष
डिजिटलायझेशनचा वापर वाढला. यावल तालुक्यात व्ही स्कूलचा वापर. रावेर तालुक्यात पेपर कृती उत्तम. अमळनेर तालुक्यात उपस्थिती कमी. चाळीसगाव तालुक्यात उत्कृष्ट प्रगती. धरणगाव तालुक्यात गुणवत्ता ढासळली.
चाळीसगाव तालुक्यात इंग्रजीचे वाचन उत्तम
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील जिल्हा परिषद शाळेत अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असता याठिकाणी चौथीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे वाचन उत्तम असल्याचे दिसून आले. तर पिंपळगाव प्र.दे. येथील जिल्हा परिषद शाळेत देखील वाचन क्षमता चांगली असल्याचे दिसून आल्याने याठिकाणी अधिकाऱ्यांनी गुणवत्ता वाढवल्याने समाधान व्यक्त केले. यासोबतच वावडदा येथे डिजिटलायझेशन अधिक असून याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.