आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप युनिटमध्ये आग:लगेचच पाऊसही आल्याने वेळीच टळला मोठा अनर्थ; कारण गुलदस्त्यात

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप युनिटमध्ये आग रविवारी दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान आग लागली. ही आग भरपावसात लागली आणि महापालिकेचे दोन बंबही लगेच पोहचल्याने मोठा अनर्थ टळला, आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

एसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप युनिटला दुपारी सव्वातीन वाजता आग लागली. वर्कशॉपच्या भंगार युनिटमधून धूर येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे लक्षात आले. आगीचे माहिती कळताच आग विझवण्यासाठी महापालिकेचे दोन बंब उपस्थित झाले. याच दरम्यान, पावसालादेखील सुरुवात झाल्याने आग पसरण्यास अडथळा आला.

या स्क्रॅप युनिटलगत कोणत्याही प्रकारची विद्युत लाइन नसल्याने आग लागण्यास शॉर्टसर्किटचे कारण नाही. या स्क्रॅप युनिटलगतच्या भिंतीजवळ एसटीची जुनी वसाहतही आहे. पाऊस नसता तर आग पसरून मोठी हानी झाली असती. मात्र, वेळीच आग अटोक्यात आल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. या अगीवर अग्निशमन टीमने दोन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

भारत बारी, रवींद्र बोरसे, वाहन चालक सुसूफ पटेल, नंदकिशोर खडके, मोहन भाकरे, नितीन बारी यांनी दोन बंबांच्या सहाय्याने पाणी व फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी एसटी यंत्र अभियंता चालक श्रावण सोनवणे उपस्थित होते.

पाऊस नसता तर झाली असती हानी

एसटीच्या स्क्रॅप युनिटमध्ये मोठ्याप्रमाणात भंगार पसरले आहे. यात एसटीचे विविध पार्ट, बसेसचा सांगाडा, सीट, रबर आदी साहित्य मोठ्याप्रमाणात पसरले आहे. तसेच येथे वाळलेले गवत, झाडाच्या फांद्या व या युनिटलगतच भिंतीपलीकडे एसटी कर्मचाऱ्यांची जुनी वसाहतही असल्याने पाऊस नसता तर ही आग मोठ्याप्रमाणात पसरून मोठी हानी झाली असती.

बातम्या आणखी आहेत...