आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या श्रीराम रथोत्सवाची दीडशे वर्षांची परंपरा:प्रभू रामचंद्राच्या जयघोषात रथ उत्सवाला सुरुवात; गुलाल, फुलांची उधळण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शुक्रवारी कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त दीडशे वर्षांची परंपरा असलेला रथोत्सवाला सुरुवात होऊन रथ दुपारी 12.35 वाजता हालला.

फुलांची उधळण...

यंदा प्रथमच मंदिराची तीन क्विंटल झेंडू, एक टन शेवंती व गुलाबाद्वारे सजावट करण्यात आली. रथाची दोन क्विंटल फुलांद्वारे सजावट करण्यात आली. रथ मार्गात 14 क्विंटल फुलांची उधळण करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांचा उपयोग 2 क्विंटलने अधिक असल्याचे संस्थानचे गादीपती मंगेश महाराज यांनी सांगितले.

गुलालाची उधळण...

सनई, चौघड्याच्या सुरात व ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात देवादिकांच्या हस्ते विधिवत पूजन करून दुपारी 12.35 वाजता रथाला ओढण्यास सुरुवात झाली. रथ हलल्यानंतर भाविकांनी केलेल्या ‘सियावर रामचंद्र की जय..., जय श्री राम.., प्रभू रामचंद्र की जय...' या जयघोषाने सुवर्णनगरी दुमदुमली होती.

दरम्यान संस्थानतर्फे प्रारंभी शांतीपाठ, गणेश, गरुड, मारुती देवतांचे पूजन, रथचक्राचे पूजन करून रथास कोहळे अर्पण करण्यात आले. त्यानंतर श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रांगणात संस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि विद्यमान गादीपती मंगेश महाराज जोशी, श्रीराम महाराज यांच्या हस्ते शहरातील समस्त ब्राह्मणवृदांच्या मंत्रोच्चारात रथाची विधिवत महापूजा करण्यात आली. यंदा प्रथमच 20 क्विंटल फुलांचा वापर करून मंदिर, रथ व मार्ग फुलांनी सजला होता. 6 किलोमीटर रथमार्गात विविध ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली.

मार्गात झाली फुलांची उधाळण ...

मंदिरातील फुलांची सजावट ही मंदिर संस्थानतर्फे करण्यात आली. यासाठी ६ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. तर रथावरील सजावट ही अरविंद मणियार यांनी केली. स्नेह मित्रमंडळातर्फे 108 किलोंचा हार चढवण्यात आला. तर रथ मार्गात सराफ बाजार, रथ चौक, बोहरा गल्ली, अचानक मित्र मंडळ, नटराज मित्रमंडळ आदी परिसर मिळून या मार्गात 14 टन फुलांची उधळण करण्यात आली.

रथोत्सवानिमित्ताने देश-विदेशातून आले भाविक ...

जळगावच्या रथानिमित्ताने जुन्या जळगावातून अनेक भाविक दरवर्षी जळगावी येतात. यात नितीन ठोसर हे रथोत्सवानिमित्ताने खास अमेरिकेतून आले. देवळाला भोजक (शर्मा) यांनी साऊथ आफ्रिकेतून तर लेखणी शर्मा (अमेरिका) या जळगावातील लेकींनी व्हिडिओ कॉलद्वारे रथातील श्रीरामांचे दर्शन घेतले.

रथाच्या सजावटीने वेधले लक्ष

प्रभू श्रीरामांच्या रथाला भगवे ध्वज, झेंडू, शेवंती व गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंबा, नारळांची तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब, उसाची मोळी लावून रथ आकर्षक असा सजवण्यात आला होता. या सजलेल्या भव्य रथाचे व रथावर विराजमान प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या रथाला चाकापासून ते कळसापर्यंत आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...