आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:वाळूतस्करांवरील कारवाईचा आता संडे टू संडे द्यावा लागणार अहवाल

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. रविवार ते रविवारपर्यंत केलेल्या साप्ताहिक कारवाईचा अहवाल महसूल, पोलिस व परिवहन विभागाने जिल्हा खनिकर्म विभागाला सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात जिल्हाभरात फिरत्या पथकांद्वारे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांचा शोध घेण्यात यावा. त्या व्यक्तींवर व वाहनांवर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी स्वरूपाच्या कारवाया करण्याबाबत पोलिस, महसूल व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या तिन्ही विभागांमार्फत केलेल्या दंडात्मक व फौजदारी स्वरूपाच्या कारवायांची साप्ताहिक माहिती रविवारी रात्री १२ वाजेपासून पुढील रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत विहित नमुन्यात दर सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत गौण खनिज शाखेत द्यावी, माहिती सादर करण्यासाठी जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नियुक्त कर्मचाऱ्यांचे नाव व मोबाइल क्रमांकही सादर करण्यात यावा, अशा सूचना आहेत.

कारवाईनंतर वाढली अवैध वाहतूक
जिल्हाधिकारी मित्तल हे रुजू झाल्यानंतर त्यांनी तत्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नदीपात्रात धाव घेतली. अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली. त्यानंतर अवैध वाळू वाहतुकीवर चाप बसणे अपेक्षित होते मात्र, त्याचा उलटा परिणाम सध्या दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...