आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेमवारपासून सर्वेक्षणाला सुरूवात:ईच्छादेवी ते जकात नाक्यापर्यंतचा रस्ता हाेणार ; वर्षभराची कामासाठी दिली मुदत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ईच्छादेवी चाैक रस्त्यांच्या कामाची गरज लक्षात घेता आचारसंहिता असतानाही विशेष बाब म्हणुन काॅक्रीटीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. मक्तेदाराला पीडब्लूडीकडून कार्यादेश देखिल देण्यात आले आहेत. त्यामुळे साेमवारपासून तातडीने सर्वेक्षणाला सुरूवात हाेईल. अत्यंत खराब स्थितीतील डीमार्टपर्यंतचा रस्ता मार्चपर्यंत करण्याचे नियाेजन आहे.शहरातील सगळ्यात खराब रस्त्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या इच्छादेवी चाैक ते माेहाडी रस्त्याने वाहन चालवणेही अवघड आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली जात आहे.

जानेवारी अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेश हाेईल मक्तेदार अभिषेक काैल म्हणाले, कार्यादेश मिळाल्याने साेमवारपासून रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. आठवडाभरात काॅक्रीटीकरणाच्या कामासाठी संपुर्ण तयार केली जाईल. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात हाेईल. ईच्छादेवी चाैकापासून शिरसाेली राेडवरील जुना जकात नाकापर्यंत अर्थात २६०० ते २७०० मीटर लांबीचा हा रस्ता तयार केला जाईल. यात १० सेमी पर्यंत डीएलसी व त्यावर २० सेमी जाडीचा पीक्युसी ( पेव्हमेंट क्वाॅलिटी काँक्रीट) असा एक फुट जाडीचा हा काॅक्रीट रस्ता असेल.

बातम्या आणखी आहेत...