आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्कटलेली घडी:आयुक्तपदी आयएएस अधिकारी हवा, महापौरांनी जाहीर केली भूमिका; पालकमंत्र्यांकडेही करणार मागणी

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी तसेच विकास कामांचे नियोजन करण्यासाठी जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती गरजेचे आहे. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली असून, लेखी मागणी करणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होते याची उत्सुकता आहे. कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या मनपाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे; परंतु पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे काही गट मर्जीतील अधिकारी आयुक्तपदी विराजमान व्हावा यासाठी प्रयत्न करताहेत. आयुक्तपदाची संधी मिळण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर महाजन यांनी मत व्यक्त केले. शहरात कधी नव्हे एवढा निधी मिळाला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण व जनतेच्या हिताची कामे होणे गरजेचे आहेत. अनेक वर्षे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय गाडा व्यवस्थित चालवताना राजकीय परिस्थिती हाताळणारे तसेच विकासाचे नियोजन करण्यासाठी शासनाने आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करायला हवी, अशी मागणी महापौर महाजन यांनी केली.

आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश लवकरच निघणे शक्य
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी तोंडी चर्चा केली आहे. लवकरच शासन आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश काढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शासनाकडे आयएएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...