आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत‎ पालकांची भूमिका महत्त्वाची‎

‎जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संकल्प फाउंडेशनतर्फे ‘मुलं आणि‎ मोबाइल'' या विषयावर पालक शाळा घेण्यात आली.‎ यात विवेक काटदरे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत‎ अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक या शिवाय पालकांनी‎ घ्यावयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे‎ सांगितले. यात शिक्षक, शाळा एका पठडीत किंवा‎ विशिष्ट चौकटीत शिक्षण देण्याचे काम करतात.

मात्र,‎ मुलांच्या वैचारिक कक्षा रुंदावण्यासाठी, बौद्धिक‎ प्रगल्भतेसाठी, चांगलं व्यक्तिमत्त्व आणि सूज्ञ व्यक्ती‎ घडण्यासाठी पालकांची भूमिका नेमकी कशी असावी‎ याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संचालक विशाल‎ पाटील यांनी मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी‎ असे कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. या वेळी‎ सुनील न्याती, देवल पाटील, अतुल पाटील उपस्थित‎ होते. अपेक्षा घाटे यांनी सूत्रसंचालन केले. दिव्या‎ पाटील यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...