आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:धानो-यात कोरोना लससाठी उडाली झुंबड, आरोग्य विभागाचे नियोजनशुन्य काम

धानोराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दि २९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. यावेळी वशीला सुरु असल्याचे सांगत गावातील,परीसरातील ग्रामस्थ यांनी सांगितले. तर नाव नोंदणी साठी एकच टेबल असल्याने नोंदणी करण्यास उशीर लागत होता. येथिल स्थानिक कर्मचारी आपल्या मर्जीतील लोकांची नोंदणी अगोदरच ठेवत आहेत.

यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दुसरीकडे दोन वैद्यकिय अधिकारी असुनही येथे लस साठी नियोजन केले जात नसल्याने समस्या अधिक वाढत आहेत. लशींचा पुरवठा व्यवस्थितपणे होत आहे पण येथे लस उपलब्ध असुनही नियोजनशुन्य कामामुळे आलेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.काही महीला रोजंदारी थांबवून लस साठी पूर्ण दिवस ताटकळत बसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...