आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश यादी:आरटीई प्रवेशाची दुसरी प्रतीक्षा यादी उद्या प्रसिद्ध होणार, प्रवेश कधी निश्चित होणार?

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार २५ टक्के प्रवेश अंतर्गत २०२२-२०२३ वर्षांकरिता पहिली प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील ५९४ विद्यार्थांचा समावेश होता. ६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, २२२ जागा रिक्त राहिल्या आहे. दरम्यान, पालक दुसरी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असून सोमवारी ही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ५९४ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत ३७२ प्रवेश निश्चित झाले आहे. या फेरीच्या प्रवेशासाठी ६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, २२२ जागा रिक्त राहिल्या आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ३१४७ जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार पहिली निवड यादी २९४० विद्यार्थ्यांची जाहीर झाली होती. राज्यभरात १५ जूनपासून शाळा सुरु होत असताना आरटीईची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थी कधी प्रवेश निश्चित करून शाळेत जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...