आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा रक्षक:सुरक्षारक्षकानेच 90 हजार रुपयांचे साहित्य लांबवले ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी परिसरातील जे सेक्टरमधील स्टार फॅब्रिकेटर कंपनीतून कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह एकाने ९० हजार रुपयांचे साहित्य लांबविल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.सतीश नाना बाविस्कर असे चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. एमआयडीसी जे-सेक्टरमध्ये स्टार फॅब्रिकेटर कंपनी आहे. कंपनीतून तीन प्रेस टुल डाईज व कंपनीच्या आवारात पडलेले पत्राचे तुकडे असे ९० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...