आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षारक्षकच निघाला चोर:जळगावमधील कंपनीतून 90 हजारांचे साहित्य लांबवले; सीसीटीव्हीतून सत्य आले समोर, गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीच्या जे सेक्टरमधील स्टार फॅब्रिकेटर कंपनीतून कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह एकाने 90 हजार रुपयांचे साहित्य लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश नाना बाविस्कर असे चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

एमआयडीसी जे-सेक्टरमध्ये स्टार फॅब्रिकेटर कंपनी आहे. कंपनीतून तीन प्रेस टूल डाइज व कंपनीच्या आवारात पडलेले पत्राचे तुकडे असे 90 हजारांचा मुद्देमाल कंपनीतील सुरक्षारक्षक सतीश याच्यासह एकाने चोरून नेल्याची घटना 10 मे रोजी रात्री 9.15 वाजता घडली.

चोरी कशी आली उघडकीस?

चोरीच्या दुसऱ्या दिवसापासून सतीश काही कारणानिमित्ताने सुटीवर गेला. यावर कंपनीचे सुपरवायझर यांनी बुधवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात सतीशने कंपनी बंद झाल्यानंतर सर्व लाइट बंद केले. मोबाइलचा प्रकाशात प्रेस टुल डाइज व काही भंगार साहित्य मुख्य गेटजवळ आणून ठेवले. यानंतर सतीश व रिक्षाचालक या दोघांनी हे साहित्य रिक्षेत भरून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून उघड झाला. या प्रकरणी सुपरवायझर धीरज नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुधीर सावळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...