आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुजन समाजाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची कास धरावी. संघटित होऊन महात्मा फुले यांचा कृतिशील वारसा चालवणे आजही काळाची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती माेर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जळगावात केले.
सत्यशोधक समाजाने २४ सप्टेंबर राेजी १५०व्या वर्षांत पदार्पण केले. महात्मा फुले यांच्या अतुलनीय ऐतिहासिक कार्याच्या वाटचालीची कृतज्ञ आठवण म्हणून शनिवारी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, सत्यशोधकी साहित्य परिषद, भीम-रमाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्स यांच्यातर्फे श्रीरत्न कॉलनीत आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. सत्यजित साळव, इंदिरा जाधव उपस्थित हाेत्या. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या दीडशे वर्षांच्या पदार्पणानिमित्त अथर्व प्रकाशनास महात्मा फुले यांचा सुबक अर्ध पुतळा भेट म्हणून संगीता माळी यांच्याकडे सुपुर्द केला. कुमुद माळी, बापू शिरसाठ सुनील दाभाडे, मनोहर खोंडे, बापू पानपाटील, महेश शिंपी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
महात्मा फुले यांचे कार्य आणि विचार दीपस्तंभासमान
प्रा. डॉ. के. के अहिरे : महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी लाखमाेलाचे ग्रंथ लिहिले. इतकेच नव्हे तर त्यांनी व्यवस्थेला परखड शब्दात जाब विचारण्याचे काम त्या काळात ‘शेतकऱ्यांच्या आसूड’ या ग्रंथातून सशक्तपणे केले आहे.
प्रा. डाॅ. सत्यजित साळवे : सत्यशोधक समाजाचे तत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवून सर्व समाजात सत्यशोधकी विवाह लागले तर फुले यांचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण होईल. तरुणाईने त्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.