आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरोग रुग्ण:क्षयरोग केंद्रात रुग्ण नसताना जीएमसीतील स्टाफ वाढवला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय रुग्णालयात असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग केंद्र विभागात सध्या रुग्ण कमी आणि कर्मचारी जास्त अशी स्थिती आहे. गेल्या चार महिन्यात क्षयरोगाचे केवळ ५० रुग्ण तपासणीसाठी आले आहेत.

तर महिन्याला सरासरी केवळ १२ ते १५ रुग्ण असल्यामुळे याठिकाणी केवळ एक परिचारिका एवढा स्टाफ गरजेचा असताना तेथे दोन परिचारिका कार्यरत आहेत. त्यातही कार्यमुक्त केलेल्या आणखी एक परिचारिकेला केंद्रात आवश्यकता नसतानाही २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा क्षयरोग केंद्रात पदस्थापना दिली आहे. एकूण ३ परिचारिका याठिकाणी देण्यात आल्या आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांचे हे आदेश पुन्हा चर्चेत आहेत. यापूर्वी मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात देखील एकही रुग्ण नसताना तेथे २२ परिचारिका कार्यरत आहेत. तसेच ४ ते ५ डॉक्टर्स कार्यरत आहे. शासकीय रुग्णालयात मात्र मनुष्यबळाचा तुटवडा असून परिचारिकांची आवश्यकता भासत आहे. अशावेळी गरज नसताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांचे मनुष्यबळ काढून घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...