आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासाचा टप्पा:पाच नद्यांच्या अभ्यासाचा टप्पा डिसेंबर अखेर पूर्ण

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणू या नदीला’ या अभियानांतर्गत गुरुवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील पाच नद्यांचा अभ्यास करुन डिसेंबर अखेर माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत.बैठकीला सदस्य सचिव उपवनसंरक्षक विवेक होसिंग, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच योजनेचे समन्वयकांची उपस्थिती होती. या अभियानांतर्गत राज्यातील किमान ७५ नद्यांवर नदी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील गिरणा, तितूर, डांेगरी, बेलगंगा, भोनक व भराडी या पाच नद्यांचा समावेश आहे. ३० नोव्हेंबरपर्यंतच यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आदेश होते. दुसरा टप्पा १ ते १ डिसेंबर तर तिसरा टप्पा १ ते २१ जानेवारी या कालावधीत अंतीम अहवाल करण्याचा आहे. यात्रेत नदी खोऱ्यांचे नकाशे, पुररेषा, पर्जन्याच्या नोंदी, गेल्या पाच वर्षातील पूर व दुष्काळाच्या नोंदी संकलित केल्या जाणार आहे. या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...