आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुल:भोईटेनगर उड्डाणपुलाचा विषय पुन्हा तापू लागला ; भिकमचंद जैननगरवासी झाले आक्रमक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून रेंगाळलेल्या भोईटेनगर उड्डाणपुलावरून पिंप्राळाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. आर्मसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनाच्यादृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्न करीत नसल्याचा रोष मुक्ताईनगर कॉलनी व परिसरातील नागरीकांनी व्यक्त केला. आठ दिवसांत भूसंपादन संदर्भात निर्णय घेऊन प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मुक्ताईनगर कॉलनी, भिमकचंद जैननगर, प्रेमनगर, भोईटेनगर, पिंप्राळा परिसर, खोटेनगर भागातील रहिवाशांनी महापाैर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड यांची भेट घेतली. गेल्या दोन वर्षापासून भोईटेनगर रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचा विषय गाजतो आहे. पुलावरून पिंप्राळा परिसरात जाण्यासाठी भुजा उभारण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यासाठी दोन्ही बाजुने जागांची पाहणी झाली. दोन वर्षात मनपा प्रशासनाने काहीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अन्यथा आंदोलन : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक आयाेजित केली जाईल. त्यात रेल्वे, मनपाचे अधिकारी उपस्थित असतील, असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले. आठवडाभरात भूसंपादन व रस्त्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन करु असा इशारा सागर पाटील, संदेश भोईटे, भूषण परदेशी, डी. सी. पाटील, गुलाब चौधरी, गणेश वाणी, महेश चिंचोलकर, हितेश शहा, नितीन नेवेंनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...