आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीत अपघात:दिंडींसाठी निघालेले टँकर गौताळ्यात दरीत कोसळला! सुदैवाने कोणीतीही जीवितहानी नाही

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चांदसर येथून पंढरपुढकडे निघालेल्या दिंडी सोबत चालणारा पाण्याचा टँकर गाैताळा घाटात कलंडला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.

श्री क्षेत्र चांदसर येथून पंढरपुरसाठी दिंडी रवाना झाली आहे. नागद सायगव्हाण मार्गेे कन्नड गाैताळा घाट चढत असतांना अरूंद रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने दिंडीला चाढण्यासाठी अचडणी येत होत्या. दिंडीसाेबत टँकर वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी घेवूच चालत हाेता. अरूंद रस्त्यावर समाेरून ट्रक उभा असल्याने तेथून मार्ग काढतांना टॅकरच्या चालकाचा ताबा सुटला. टँकरसह ट्रक्टर शेजारच्या खाेलदरीमध्ये काेसळले. दिंडीसाेबत चालणाऱ्या वारकऱ्यांना काेणतीही इजा झाली नाही. यावेळी दिंडीसाेबत असलेले संजय पवार, सुनिल पवार यांनी दिंडीसह शेजारचे गाव गाठले. यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने क्रेन पाठवून दरीतून ट्रक्टर बाहेर काढले.

खराब रस्त्यामुळे अडचणी

गाैताळा घाटात पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झालेला आहे. येथून वाहनांची गर्दी हाेत असल्याने कच्चा रस्ता खचण्याची भिती असते. पावसाळ्यात पावसामुळे रस्ता खचून अपघात हाेण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे येथील पुलाचे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...