आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये चोरटे सुसाट:पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी शिक्षकाचा मोबाइल लांबवला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कोर्ट चौकाकडे येण्यासाठी पायी चालत असलेल्या एका शिक्षकाचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी लांबवला. 5 जून रोजी भरदुपारी ही घटना घडली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. रुपेश सुधाकर पाटील (वय 31, रा. जामनेर) या शिक्षकासोबत ही घटना घडली आहे. पाटील हे न्यु इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी करतात.

फोन खिशातून काढला अन्...

अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी सुटी असल्यामुळे रूपेश पाटील हे काही कामाच्या निमित्ताने जळगावात आले होते. पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरुन ते क्रीडा संकुलकडे पायी चालत येत होते. यावेळी त्यांनी भावाला फोन लावण्यासाठी खिशातून मोबाइल काढून कानाला लावला. सेकंदातच त्यांच्या मागून एका मोपेड दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या कानाजवळून मोबाइल हिसकावून घेत कोर्ट चौकाकडे पळ काढला.

दुचाकी विनाक्रमांकाची

या भामट्यांकडे लाल रंगाची मोपेड दुचाकी असल्याचे पाटील यांनी पाहिले. दुचाकी विनाक्रमांकाची हाेती. तर मोबाइल हिसवणारा भामटा शरिराने जाड व निळ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. पाटील यांनी आरडाओरड केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

पोलिस दलात खळबळ

चोरीची घटना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर घडल्यामुळे पोलिस दलातही प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...