आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:जळगावचे तापमान महाबळेश्वरपेक्षा दाेन अंशाने कमी; दाट धुक्यामुळे दृश्यमानता 600 मीटरवर

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान २२.७ अंशाच्या नव्या निच्चांकावर हाेते. त्यामुळे दिवसभर गारठा कायम हाेता. ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे गुरूवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शिवाय ताशी १८ किलाेमीटर वेगाने थंड वारे वाहिल्याने दिवसा हुडहुडी जाणवली. या वातावरणाचा सकाळ सत्रातील शाळांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. विशेष म्हणजे जळगावचे कमाल तापमान महाबळेश्वरपेक्षा दाेन तर नाशिकपेक्षा सहा अंशाने कमी हाेते.

सलग दुसऱ्या दिवशी जळगावचे कमाल तापमान २२.७ तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस हाेते. रात्री आणि दिवसाच्या तापमानात केवळ १० अंश सेल्सिअसचे अंतर असल्याने रात्री व दिवसा थंडीची तीव्रता जवळपास सारखीच हाेती.

स्वेटर, मफलर, टाेपी घाला
जिल्ह्यात थंडी वाढताच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने उपाय सुचवले. जिल्हा नियंत्रण कक्ष, पाेलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष, मनपाचा नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रूग्णालयातील नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी थंडीच्या लाटेबाबत गुरूवारी पत्रक काढलेे. स्वेटर, मफलर, टाेपी घालूनच घराबाहेर पडा असे त्यात म्हटले.

ढगाळ वातावरण निवळणार
दाेन दिवस ‘काेल्ड-डे’ची स्थिती असलेल्या जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी ढगाळ वातावरण काहीसे निवळू शकते. २२ अंशावर आलेले कमाल तापमान शुक्रवारी २६ अंशापर्यंत पुढे जाईल. दुपारी ढगाळ वातावरण निवळून सूर्यदर्शन हाेऊ शकते. शनिवारनंतर रात्रीच्या वेळी गारठा वाढू शकताे.

जळगाव शहर नाशिकपेक्षाही थंड
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही गुरूवारी जळगावात अधिक थंडी हाेती. जळगावचे कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस तर बुलडाण्याचे कमाल तापमान अवघे १९.८ अंश सेल्सिअस एेवढे हाेते. त्यामुळे दिवसा नागरिकांना शहरात रस्त्याच्या काठावर शेकाेट्या पेटवाव्या लागल्याचे जाणवले.

मदतीसाठी टाेलफ्री क्रमांक जाहीर
जिल्हा नियंत्रण कक्ष : टाेल फ्री : १०७७ (०२५७) २२१७१९३ / २२२३१८०, पाेलिस मुख्यालय : टाेल फ्री १०० (०२५७) २२२३३३३ / २२३५२३२, मनपा नियंत्रण कक्ष टाेल फ्री - १०१,१०२ (०२५७) २२३७६६६ / २२२४४४४, जिल्हा रूग्णालय, टाेल फ्री रूग्णवाहिका १०८ (०२५७) २२२६६११ असे संपर्क क्रमांक आहेत.

बातम्या आणखी आहेत...