आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:चोरी केल्यांनतर काही तासांतच चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेडियम चौकात चायनीजची हातगाडी, पानटपरी, चहाचे दुकान फोडून नंतर दुसऱ्या जागी चोरी करण्यासाठी निघालेल्या तीन चोरट्यांना साेमवारी जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. पराग रवींद्र जावळे (वय २१, रा. सम्राट कॉलनी), अमर शांताराम भारोट (वय २८, रा. शिवाजीनगर) व मुकेश रमेश राजपूत (वय २४, रा. नाथवाडा) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी एमएच-१९, व्ही-६८९७ क्रमांकाच्या रिक्षेतून येत सोमवारी रात्री स्टेडियम कॉम्प्लेक्स जवळील माउली चायनीज सेंटरची टपरी, अंकुर हॉस्पिटल समोरील साइराम टी सेंटरची टपरी लोखंडी कतावणीने फोडली. या टपरीतून साहित्य चोरले. त्यानंतर ते रिक्षेसह बहिणाबाई उद्यानाजवळ येऊन उभे होते. या वेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी जुबेर तडवी, अमित मराठे, देविदास पाटील, प्रमोद पाटील, होमगार्ड विनोद ठाकूर, विशाल सोनार, सचिन मनोरे हे गस्त करीत असताना त्यांना संशय आला. त्यांनी तिघांना त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन खाक्या दाखवला. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...