आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्ध साहित्य संमेलन:जळगावात तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बौद्ध साहित्य परिषद संलग्न बौद्ध साहित्य प्रसार संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे जानेवारी २०२३ मध्ये आयाेजित करण्यात आले आहे, अशी माहिती बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. भरत आत्माराम शिरसाठ यांनी दिली.

संमेलनाची नियोजन सभा रविवारी संत चोखामेळा वसतिगृह येथे झाली. यात जिल्हा बौद्ध शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक राजेंद्र पारे हे होते. डॉ. सत्यजित साळवे यांनी भूमिका मांडली. प्रा. नरेंद्र गायकवाड यांनी साहित्य संमेलनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीवर सविस्तर प्रकाश टाकला. बुद्धाला एका जातीमध्ये बंदिस्त करता येणार नाही. बुद्ध हा सर्वांचा आहे आणि म्हणून बुद्ध विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचे कर्तव्य सर्वच समाजाचे आहे असे धनराज मोतीराय यांनी सांगितले. यावेळी रणजित सोनवणे, हेमेंद्र सपकाळे व युवराज वाघ उपस्थित हाेते.