आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेस्टाइल चोरीचा थरार:चोपड्यात 2 मोटार सायकलीवरुन 4 जणांनी तब्बल 15 लाखांची बॅग पळवली, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

चोपडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा शहरातील बसस्थानकाजवळील आडगाव रिक्षा स्टॅंडजवळ असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खाली दोन मोटार सायकलवरील तीस ते चाळीस वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी 15 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

शहरातील व्यापारी संतोष उर्फ दगडू अग्रवाल यांचा कर्मचारी संजय शिवदास पालीवाल (५२) यांनी आयडीबीआय बँकेतून १५ लाख रुपये काढून खाली उतरून अॅक्टिव्हा या मोटार सायकलवर ठेवलेले असताना ते अचानक खाली पडले. तेवढ्याच वेळात कापडी पिशवीवर पाळत ठेऊन सिनेस्टाईल पद्धतीने दोन मोटार सायकलीवरुन चार जणांनी तब्बल १५ लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील लक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंगचे मालक संतोष हरसाय अग्रवाल उर्फ दगडूशेठ अग्रवाल यांच्याकडे साधारण पणे २० वर्षांपासून कामास असलेला कर्मचारी संजय शिवदास पालिवाल (५२) रा संजीवनी नगर चोपडा हे आज दि ८ रोजी दुपारी शिवाजी महाराज चौकातील आशिष कृषी केंद्रावरून मालक मनोज अग्रवाल यांनी साधारण पणे तीन वाजता बँकेत पैसे काढण्यासाठी पाठवले. मनोज अग्रवाल यांनी बैकेतून पैसे काढून आणा म्हणून एक चेक दिला होता. यावरून पालिवाल यांनी शहरातील बसस्टँड जवळील आडगाव, गोरगावले, रिक्षा स्टॅंडजवळ असलेल्या सहकार समृद्धी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयडीबीआय बॅंकेत तो चेक( क्र-२७४७२६) देऊन बँक कॅशीयरकडून रोख १५ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन पालिवाल हे खाली उतरले आणि नेहमीप्रमाणे आपल्या ताब्यात असलेली ऍक्टिव्हा स्कुटीवर बसून गाडी सुरू करताना ते अचानक खाली पडले तेवढ्याच काही सेकंदातच त्या चारपैकी दोन आरोपींनी पाळत ठेवली आणि दोन चोरट्यांनी ती १५ लाखाची पिशवी पद्धतशीरपणे आपल्या ताब्यात घेऊन तेथून एकाच वेळी चारही चोरांनी बसकडे धाव घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले.

ही सर्व घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र त्यांच्या मोटार सायकलींचे नंबर हा स्पष्ट दिसत नसल्याने आता पोलीसांना आरोपी अटक करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. नेहमी प्रमाणे जवळपास पंधरा वर्षांपासून जिनिगमध्ये कामाला असलेले पालिवाल हे आज दुपारी ३:१५ वाजता बँकेतून काढलेले पंधरा लाख एका बॅगेत पैसे ठेऊन खाली उतरले. यावेळी दोन मोटार सायकली वर आलेले एकूण चार जण त्याच्यावर पाळत ठेवत होते असे सीसीटीव्ही वरून दिसते.

बातम्या आणखी आहेत...