आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराकडून बांभाेरीकडे जाणारा एक ट्रक गिरणा नदीवरील पुलावर बंद पडल्याने महामार्गावर सुमारे दीडतास वाहतूक काेंडी झाली. दाेन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. त्यात सुमारे ७०० ते ७५० वाहने थांबून हाेती. बंद वाहनाला धक्का मारून दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने दिलासा मिळाला.
मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगावातून धुळ्याकडे जात असलेल्या ट्रकचे इंजीन बंद पडून ती लाॅक झाली. त्यामुळे कुठेच हलचाल हाेत नव्हती. त्यामुळे वाहतूक काेंडी हाेण्यास सुरुवात झाली. आपणच अगाेदर निघावे म्हणून वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने नेल्याने वाहतूक काेंडी वाढली. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. वाहतूक काेंडीची माहिती शहर वाहतूक शाखेला कळल्यानंतर पीएसआय ए. आर. इंगळे यांच्या नेतृत्वाखालील किरण मराठे, शेखर जाेशी, साेपान पाटील, याेगेश पाटील यांचे पथक दाखल झाले.
त्यांनी नव्याने महामार्गावर दाखल हाेणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवून गिरणा पुलाचे बांभाेरीकडील टाेकाचे घटनास्थळ गाठले. या ठिकाणी संबंधित ट्रकचे बुश सैल करून तिला ढकलून व दुसऱ्या वाहनाच्या सहाय्याने टाेचन करून पुलाच्या बाहेर काढले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तासाभराचा अवधी लागला. वाहतुक काेंडीमुळे खाेटेनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. तर दुसऱ्या बाजूला जैन कंपनीच्या शेजारील पेट्राेलपंपापर्यंत वाहने थांबून हाेती. त्यामुळे माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.