आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष बीज टाकलेल्या 60 मूर्तीं:रुशील मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे देण्यात  आले हाेते प्रशिक्षण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रुशील मल्टिपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांगांसाठी शाडूमातीपासून मूर्ती बनण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. या दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे गणराय साकारले. या मुलांनी बनवलेल्या ६० मूर्ती या मुलांना मोफत देण्यात आल्या.

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात संस्थापिका हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉ. जयश्री कळसकर यांच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी, शिक्षकांसाठी मोफत ऑनलाइन गणपती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले होते. या दिव्यांग मुलांनी शाडूमातीपासून ६० सुबक मूर्ती साकारल्या. या मूर्ती साकारताना त्यात विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया टाकण्यात आल्या होत्या. संस्थेच्या जयश्री पटेल, सोनाली भोई, हेतल वाणी, आयुषी बाफना उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...