आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हांतर्गत बदली पोर्टलचे लॉगिन शिक्षकांसाठी सुरू:पुढील वर्षी 5 जानेवारीला बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक बदल्यांच्या संदर्भात शासनाने एप्रिल महिन्यात दिलेल्या आदेशानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू झालेले आहे. 5 जानेवारी 2023 रोजी बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

7 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांनी बदली पाहिजे असल्याचे संबधीत माहिती भरेलली आहे. यात बदलीस पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास तसेच जोडीदाराच्या संदर्भातील माहिती भरण्यात आली आहे. आता 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एक मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसात पोर्टलवर आपला 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवता येणार आहे.

शिक्षकांना आपल्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील. विशेष संवर्ग भाग दोन साठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत राहिली. त्यात 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांची बदली होणार नाही, त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरण्यास मुदत आहे. सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम तीन दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवायचा आहे. ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास व ते शिक्षक बदली पात्र शिक्षक नसल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही. याशिवाय अवघड क्षेत्र, स्कूल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी सक्ती करणाऱ्या शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या बदलीची प्रक्रिया पूर्ण होऊन 5 जानेवारी 2023 रोजी बदलीचे आदेश प्रकाशित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...