आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • The Trio, Contacted By Sacri Corona Positive, Were Sent Home From The District Hospital Overnight, Called To The Hospital Again; The Locals Expressed Their Displeasure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:साक्री कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील तिघांना जिल्हा रूग्णालयातून रात्रीच घरी पाठवले, पुन्हा रूग्णालयात बोलवले; स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी

नवापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सातपुते यांनी या प्रकारचे खंडन केले आहे

धुळे जिल्ह्यातील साक्री कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आल्याने नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका दांपत्यासह चालकाला नवापुर तालुका प्रशासनाने सोमवारी संध्याकाळी सहा वाजता घरी गाठून त्यांना आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन व प्राथमिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.परंतू नंदुरबार जिल्हा रूग्णालयात रातभर देखील ठेवले नाही. रात्री 12 वाजेच्या सुमारास परत चिंचपाडा येथे पाठवल्याने चिंचपाडा गावातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. जर संपर्कात आले आहे, तरी त्यांना 14 दिवस रूग्णालयात किंवा क्वारंटाईन कक्षात ठेवणे गरजेचे आहे.

पुन्हा आज दुपारी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तिघे लोकाना संदर्भात लपंडाव सुरू असल्याची चित्र दिसून येत आहे. रात्री घरी सोडले व दुपारी पुन्हा रूग्णालयात बोलवले यासंदर्भात तालुक्यातील प्रशासनाला कळले नाही. या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सातपुते यांनी या प्रकारचे खंडन केले आहे. चिंचपाडा येथील 70 वर्षिय वयोवृद्ध व्यक्तीला किडणी विकार असल्याने जिल्हा रूग्णालयात राहण्यास अडचण आणि कोरोनाचे लक्षणे नसल्याने त्यांचे नमुने घेऊन त्यांना रात्री घरी पाठवण्यात आले होते. त्यांना किडणीचे विकारामुळे डायलेसिस करण्याची गरज असल्याने पुन्हा दुपारी जिल्हा रूग्णालयात बोलण्यात आले.या प्रकारामुळे ग्रामीण भागात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू असे आवाहन केले आहे.

चिंचपाडा येथील तिघांचा संपर्कातील आलेले लोक व परिवारातील 26 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.धुळे शहरात एका रूग्णालयात चिंचपाडा येथील दाम्पत्य डायलिसीस करण्यासाठी एका गाडीने 8 एप्रिल रोजी खाजगी गाडीने एका चालकासह तीन व्यक्ती धुळे येथे गेले असता त्यादरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मृतक कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा संपर्कात आल्याची घटना सी.सी.टी.व्ही कॅमेरेत कैद झाल्याने तात्काळ धुळे जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासनाला कळवले त्यांनी नवापूर तालुका प्रशासना माहिती दिली. जिल्हा रुग्णालयातून रात्री घरी सोडले व दुपारी परत नेले याबद्दल का माहिती दिली नाही. नवापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही. 2600 च्यावर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोलापूर येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले 11 लोकांना 14 दिवस पुर्ण झाल्याने कोणतेही लक्षण दिसून आले नाही म्हणून मंगळवारी दुपारी चार वाजता तालुका प्रशासनाने घरी सोडण्यात आले.

यातील चालक यांची पत्नी आशावर्कर असून त्यांनी परिसरात धान्य वाटप केले आहे.अनेक लोक संपर्कात आले आहे. चालक यांना कोरोना आजाराचा संदर्भात लक्षणे जरी नसले तरी देखील त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात गरजेचे आहे. सुरू असलेला लपंडाव घातक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...