आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण ठार:दुचाकी ट्रकवर आदळली; पाळधीचा तरुण जागीच ठार

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावर एका वाहनचालकाने कट मारल्याने पाळधी येथील दुचाकीस्वार प्राैढ ट्रकसमाेर धडकला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न ट्रकचालकाने केला. मात्र, त्यात अवजड वाहतूक करणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली कलंडला. या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बिबानगरजवळ मराठा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नाना नथ्थू माळी (वय ३८, रा. पाळधी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. सोमवारी तो जळगाव येथून पाळधी येथे एमएच-१९, डीक्यू-८७४९ या क्रमांकाच्या दुचाकीवर घरी जात होता. बिबानगरजवळ मराठा हॉटेलसमोर धुळ्याकडून येत असलेल्या आरजे-०१, जीबी-६४६५ या टाइल्स घेऊन जात असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात ट्रकचे चाक नाना माळीच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकचे अॅक्सल तुटले. त्यामुळे टाइल्स असलेला ट्रॉला हॉटेलसमोरील खड्ड्यात जावून पडला. ट्रकचे समोरील कॅबीन रस्त्यावरच राहिल्याने चालकाला खरचटलेही नाही. अपघातानंतर महामार्गावर आहुजानगरपर्यंत अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.

बातम्या आणखी आहेत...