आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य व सांस्कृतिक क्षेत्र:लेवा गणबोली दिनाचा विद्यापीठाला पडला विसर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंच्याच पुण्यतिथीचा अर्थात विश्व लेवा गणबोली दिनाचा विसर पडल्याने खान्देशातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. याबाबत लेवा गणबोलीचे संवर्धन आणि जतन, रक्षण करणाऱ्या, या भाषेचे स्वतंत्र साहित्य संमेलन भरवणाऱ्या लेवा गणबोली साहित्य मंडळाचे पदाधिकारी व चाहते, कवी, लेखकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेत निवेदनाद्वारे याबाबत निषेध व्यक्त केला. या वेळी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाकडून चूक झालेली आहे. यापुढे सुसूत्रता ठेवली जाईल, योग्य दिशानिर्देश दिले जातील.

विद्यापीठाच्या अर्थ संकल्पाच्या अंदाज पत्रकात खास निधीची तरतूद करून इतमामाने विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये यामध्ये ३ डिसेंबर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन “विश्व लेवा गणबोली दिन निश्चितपणे साजरा केला जाईल असे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या वेळी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, किशोरी वाघुळदे, नितीन चौधरी, शिवाजी भारंबे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...