आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:अत्याचारानंतर व्हिडिओ केला व्हायरल; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील मोढाळा येथील ४० वर्षीय महिलेचा मुलगा आणि भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन एकाने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडीओ तयार करुन ताे गावात व्हायरल केला. तसेच या महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून तिच्या पोटावर भिलावा चोळून त्वचा जाळली. साेयगाव तालुक्यातील घोसला गावात ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर महिलेने पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित महिला मोंढाळा (ता. पाचोरा) गावातील रहिवासी आहे. तर आबा अंबादास कोळी (रा. घोसला, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याने अत्याचार केला आहे. पीडित महिला लग्नसमारंभातून घरी जात असताना कोळी याने दुचाकीने तीचा रस्ता अडवला. बहिणीच्या घरी सोडून देण्याचे सांगीतले. महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तीचा मुलगा व भावास जीवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेस दुचाकीवर १२ किमी लांब असलेल्या घोसला गावातील त्याच्या शेतात घेऊन गेला. येथे त्याने अत्याचार केला आणि व्हिडीओ बनवून ठेवला. यानंतर महिलेस मोंढाळा गावात आणून सोडले. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...