आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लांटचे उद‌्घाटन‎:आसोदा येथील ग्रामस्थांना आता‎ मिळणार पिण्यासाठी शुद्ध पाणी‎

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसोदा येेथे पिण्याच्या शुद्ध‎ पाण्यासाठी आरओ वॉटर प्लांटची‎ सुविधा उपलब्ध करून देेण्यात‎ आली आहे. इंदिरानगरातील हनुमान‎ मंदिराजवळ विरबॅक अनिमल हेल्थ‎ कंपनीतर्फे सीएसआर निधीतून हा‎ प्लांट उभारण्यात आला आहे.‎ याद्वारे परिसरातील हजारो‎ नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा‎ मिळणार आहे.‎ माजी पालकमंत्री गुलाबराव‎ देवकर यांच्या हस्ते या प्लांटचे‎ उद्घाटन झाले.

पाच लाख रुपये‎ खर्चातून कंपनीने ही सुविधा दिली‎ आहे. याकामी दूध विकास संस्थेचे‎ अध्यक्ष खेमचंद महाजन यांनी‎ पाठपुरावा केला. या वेळी पंधराव्या‎ वित्त आयोगातून निर्माण केलेल्या‎ मोबाइल शौचालयाचेही उद‌्घाटन‎ झाले. सरपंच अनिता कोळी, दिलीप‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कोळी, कंपनीचे अधिकारी सचिन‎ बुधे, प्रकाश आतकर, अशोक‎ थोरात, ग्रामपंचायत सदस्य अरूण‎ कोळी, हेमंत पाटील, सुनील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील, अजय महाजन, शरद‎ नारखेडे, विजय भोळे, महेंद्र जोहरे,‎ संजोग कोळी, जीवन सोनवणे आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...