आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्याला भेट दिले राेपटे:चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा पारिताेषिके देऊन केला गाैरव

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विजेत्याला भेट दिले राेपटे

गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने महिला पर्यावरण सखी मंच व जॉइंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव यांनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा होते.

मुलांनी चित्रातून समाजाला दिलेला संदेश रुजला तर वसुंधरा सुंदर होईल, असे अध्यक्ष सहायक पोलिस अधीक्षक चिंथा यांनी मार्गदर्शनातून सांगितले. तर डॉ. अनुराधा राऊत यांनी बालपणापासून कला जोपासली तर सुंदर व्यक्तिमत्त्व घडते असे सांगितले तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलेतही पारंगत व्हावे, असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. स्पर्धकांनी पर्यावरणावर आधारित दिलेल्या विषयानुसार शेकडो चित्रे साकारली. यातील १५ चित्रांची निवड केल्याचे परीक्षक राजेंद्र पाटील, सुनील दाभाडे यांनी सांगितले. या १५ विजेत्यांना एक रोप व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. पर्यावरण सखी मंचच्या राज्य उपाध्यक्षा मनीषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. आशा मौर्य यांनी आभार मानले. रेणुका हिंगू, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, नेहा जगताप, भाग्यश्री महाजन, गायत्री चौधरी, डॉ. नीलिमा सेठिया आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विविध गटातील विजेते : पहिल्या गटात आराध्या पाटील, श्रीनिधी कोळेकर, उत्कर्ष जाधव, जयंत, स्वरा पवार, हिमानी झोपे. दुसऱ्या गटात दिव्यश्री बोरसे, पारस पाटील, निकेश जाधव, कृतिका माळी, धनश्री महाजन तर तिसऱ्या गटात निकिता पाटील, संजीवनी कलास्कर, लीना पाटील, संस्कृती घुगे, राजस चौधरी हे स्पर्धेत विजेते ठरले.

बातम्या आणखी आहेत...