आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचाेरा स्थानकावर दुरुस्तीचे काम:पाचोऱ्यातील काम संपले; रेल्वे वाहतूक पूर्वपदावर

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचाेरा स्थानकावर दुरुस्तीचे काम १४ व १५ ऑगस्ट रोजी सुरू होते. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक या चार रेल्वेगाड्या दोन दिवस रद्द केल्या होत्या.

१२ रेल्वेगाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागला. मंगळवारी काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली असल्याची माहिती स्टेशन मास्तर अमरचंद अग्रवाल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...