आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच भूखंडांचा ताबा मिळेना‎:पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या मार्गाचे काम लांबणार‎

जळगाव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिंगराेडवरील उड्डाणपुलावरून‎ पिंप्राळाकडे जाण्यासाठी तयार‎ करण्यात येणाऱ्या डाव्या मार्गासाठी‎ महापालिकेकडून अद्याप जागेचा‎ ताबा देण्यात आलेला नाही.‎ डावीकडून व उजवीकडून येणाऱ्या‎ वाहनधारकांना पिंप्राळाकडे‎ जाण्यासाठी उड्डाणपुलाला लागूनच‎ स्वतंत्र वळण मार्ग तयार करावा‎ लागणार आहे; परंतु महापालिकेने‎ भूसंपादन न केल्याने जागा‎ हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही‎ रखडलेली आहे. त्यामुळे‎ भाेईटेनगरकडे जाणाऱ्या डाव्या‎ भूजेचे काम लांबणीवर पडेल.‎ भाेईटेनगरजवळील रेल्वेगेटवर‎ उड्डाणपूल उभारणीचे काम गतीने‎ सुरू आहे.

एक किमी लांबीच्या‎ पुलासाठी २५ पिअर्स उभारण्यात‎ आले असून, गर्डर टाकण्याचे‎ कामही प्रगतिपथावर आहे. दाेन्ही‎ बाजूने आरई पॅनल उभारणी व‎ मुरूमचा भराव टाकण्याचे काम‎ सुरू आहे. दरम्यान जूनच्या‎ सुरुवातीला पुलावरून वाहतूक सुरू‎ करण्याचे नियाेजन असल्याचे‎ सांगितले जात आहे; परंतु‎ पिंप्राळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी‎ तयार करण्यात येणाऱ्या वळण ‎ ‎ मार्गासाठी (बाॅक्स) अजून मक्तेदार ‎ ‎ कंपनीकडे जागेचा ताबा देण्यात ‎ ‎ आलेला नाही. त्यामुळे जाेपर्यंत‎ जागा उपलब्ध हाेत नाही, ताेपर्यंत ‎ ‎ कामाला गती मिळणे अवघड आहे.‎

हाेळी संपली पण कामगारांचा तुटवडा अद्यापही कायम‎
उड‌्डाणपुलाच्या कामासाठी गुजरात, मध्य प्रदेशातून माेठ्या प्रमाणात मजूर‎ वर्ग जळगावात आलेला आहे. हाेळी सणाच्या निमित्ताने पुलाचे काम करणारे‎ सुमारे ४० ते ५० मजूर गावी गेल्याने किमान पंधरा दिवस कामावर परिणाम‎ हाेणार आहे. दरम्यान, या कालावधीत गर्डर उभारणीसाठी तसेच स्लॅबच्या‎ कामाला प्राधान्य दिले जाणार आहे. १० ते १५ दिवसांनी मजूर परतल्यानंतर‎ रात्रंदिवस काम करून वेळ भरून काढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...