आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दोन मित्र ग्रह सूर्य-मंगळ या राशींच्या परिवर्तनासह दैत्यगुरू शुक्रदेखील राशीत परिवर्तन करणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य १५ जूनपासून महिनाभरासाठी मित्र राशी मिथुन या राशीत प्रवेश करणार आहे. तर तिसऱ्या दिवशी १८ जूनला सुस्थित योगात दैत्यगुरू शुक्र आपल्या स्वराशी वृषभ या राशीत प्रवेश करणार आहे. तेथे बुधाबरोबर लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. तर २७ जूनला सकाळी ५.३८ वाजता मंगळ ग्रह आपल्या मूळ त्रिकोण राशी मेषमध्ये प्रवेश करून तेथे पूर्वीच असलेल्या राहूबरोबर अंगारक योग बनवेल.
शुभ-अशुभ घटना पाहायला मिळतील
तीन ग्रह राशींचे परिवर्तन तथा लक्ष्मीनारायण अंगारक योगामुळे काही शुभ-अशुभ घटनाचक्र भूतलावर पाहायला मिळेल. शुक्र व बुधच्या युतीने लक्ष्मीनारायण योगामुळे विकासाची गती वाढेल. भौतिक सुख-संपन्नता नांदणार. कृषी उत्पन्नात विकास, राजकारणाच्या दृष्टिकोनातून या काळात शुभ प्रभाव पडेल. बालकांचे आजार कमी हाेतील. मात्र, मंगळ राहूच्या युतीने येणारा अंगारक योग राजनैतिक द्वेष वाढवण्यासह आपराधिक घटनांत वाढ करेल. प्राकृतिक प्रकोपासह जनसंपत्तीची हानी करेल. देशाचा उत्तर व दक्षिण भाग अधिक प्रभावित होईल. - भूषण जोशी, राशीचक्राचे अभ्यासक
असा राहील राशींवर प्रभाव; इष्ट देवतेची आराधना करण्याचा सल्ला
मेष : मानसिक अस्थिरतेसह कमाईचे साधन वाढतील. शुभकार्यात व्यग्र, स्वकीयांकडून संयोग.
वृषभ : संपत्तीच्या नुकसानीसह उत्पन्नाच्या मार्गात वाढ.
मिथुन : राजनैतिक क्षेत्राकडून लाभ मिळणार.
कर्क : आई-वडिलांच्या स्वास्थ्यात कमी.
सिंह : शिक्षण व संतान संबंधित सुख वाढेल.
कन्या : गुप्त शत्रू हानी पोहोचवण्याची शक्यता.
तुळा : भागीदारी व दाम्पत्य सुखात अडथळा.
वृश्चिक : स्वास्थ्यावर लक्ष ठेवा.
धनू : संतानाबाबत चिंता वाढेल.
मकर : जमिनीबाबत विवाद वाढतील.
कुंभ : भौतिक सुख-संपन्नतेत वाढ, राजकारणी मित्रांपासून लाभ.
मीन : पारिवारिक त्रासाने मन दु:खी राहील.
असे करा उपाय : ज्या जातकाच्या जन्म राशीत मंगळ, शुक्र, सूर्य अशुभ आहे त्यांनी इष्ट देवतेची आराधना करावी. पंचमुखी हनुमानाचे दर्शन घ्यावे. भगवान नृसिंह यांची आराधना करणेदेखील शुभ राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.