आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी​​​​​​:बँक ऑफ महाराष्ट्र येथे‎ चोरी​​​​​​​; बँक फोडण्याचा प्रयत्न‎ करणाऱ्याला पकडले‎

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील वरखेडी‎ येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे‎ चोरी करण्याचा प्रयत्न ११ जून रोजी‎ मध्यरात्री घडला होता. या‎ चोरट्याने बँकेचा दरवाजा‎ तोडण्याचा प्रयत्न केला होता. ही‎ घटना १२ जून रोजी उघडकीस‎ आल्यानंतर मंगळवारी स्थानिक‎ गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यास‎ अटक केली आहे.‎ जुबेर इकबाल तडवी (वय २२,‎ रा. कासली, ता. जामनेर) असे‎ चोरट्याचे नाव आहे.

जुबेरने ११ जून‎ रोजी मध्यरात्री वरखेडी येथील बँक‎ ऑफ महाराष्ट्र गाठली. मुख्य‎ दरवाजा तोडून आत जाण्याचा‎ त्याचा प्रयत्न होता. सुदैवाने‎ त्याच्याकडून दरवाजा तुटला नाही.‎ बराचवेळ प्रयत्न केल्यानंतर तो‎ निघून गेला. १२ रोजी सकाळी बँक‎ कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार‎ आला. या प्ररकणी पाचोरा‎ पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने‎ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता‎ त्यातील संशयित हा जुबरे‎ असल्याचे निष्पन्न झाले होते.‎

त्यानुसार पोलिस निरीक्षक‎ किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक‎ अमोल देवढे, लक्ष्मण पाटील,‎ किशोर राठोड, रणजीत जाधव,‎ विनोद पाटील यांच्या पथकाने जुबेर‎ याला कासलीच्या आठवडे‎ बाजारातून ताब्यात घेतले. त्याने‎ गुन्ह्याची कबुली दिली. त्याने यापूर्वी‎ देखील जामनेर शहरात बँक‎ फोडण्याचा प्रयत्न केला आहे.‎ त्याला पिंपळगाव हरेश्वर पोलिस‎ ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...