आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा:अॅड. उज्वल निकमांच्या शेतातून 13 लाखांच्या लोखंडी साहित्याची चोरी, 3 दिवसांपूर्वीही येथे झाली होती चोरी

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माचला येथील उज्वल निकम यांच्या शेतातून दिनांक २१ रोजीच्या रात्री आठ वाजेपासून ते २२ रोजी च्या सकाळी सात वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ लाख ८५ हजार रुपयाची सिमेंट पाईप बनवण्यासाठी लागणारे लोखंडी साच्याची चोरी केली आहे. ही घटना माचला शेतशिवारात घडली आहे. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी ५ लाख ६८ हजार रुपयाची अशाच प्रकारचे साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर अॅड उज्वल निकम यांचे बंधू प्रवीण निकम यांनी अडावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष करून कोणताही तपास न करता या याकडे कानाडोळा केला. दरम्यान आज पुन्हा अज्ञात चोरट्यांनी साडे तेरा लाखांची जबरी चोरी केली आहे. पोलिसांनी पहिल्या घटनेत तपास केला असता तर दि २१ रोजी रात्री पुन्हा एकदा १३ लाख ८५ हजार रुपयाची या लोखंडी साहित्याची चोरी झाली नसती असेही प्रवीण निकम यांनी सांगून अडावद पोलिसांच्या कार्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या चोरीच्या घटनेत २ लाख २५ हजार रुपयांच्या दोन नग तीनशे मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड, ३८ हजार रुपये किंमतीच्या आठ नग, १ लाख ६० हजार किमतीच्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड आठ नग, ७५ हजार रुपये किंमतीच्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड तीन नग, १ लाख ४० हजार किमतीच्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड चार नग, ८० हजार किमतीच्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड चार नग, ९० हजार किमतीच्या ८०० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड दोन नग, १ लाख ४ हजार किमतीच्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड दोन नग, एक लाख रुपये किमतीच्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी मोल्ड दहा नग, १ लाख ६० हजार किमतीच्या वाहतूक गाडीचे लोखंडी मोल्ड दोन नग, ८८ हजार किमतीचे एक फुटी फुटबॉल व्यास दोन नग, ३५ हजार किमतीचे रॉड शंभर नग, ९० हजार किमतीचे एक फेव्हर मोल्ड असा एकूण १३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.

१८ तारखेला याच श्री सिमेंट प्रॉडक्ट या नावाच्या व्यवसायातून ५ लाख ६८ हजार रुपयांची लोखंडी साहित्याची चोरी झाल्याची घटना ताजी असताना दोन दिवसानंतर पुन्हा चोरांनी मोठा हात मारला. अॅड उज्वल निकम याचे बंधू प्रवीण निकम यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. आज पुन्हा अडावद पोलिस ठाण्यात प्रवीण निकम याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला असून त्या घटनेचा ठिकाणी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र त्या श्वानाला कोणताही पुरावा मिळाला नाही. पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी घटनेचा ठिकाणी पाहणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...