आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंप चोरी:एकाच शेतातून दुसऱ्यांदा पंप चोरी; यावलला डीवायएसपी सोनवणे यांनी केली पाहणी

यावल15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शेत शिवारातील विहिरीतून चोरट्यांनी २४ हजार रूपये किंमतीचे दोन वीज पंप लांबवले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे दोन महिन्यात एकाच शेतातून दुसऱ्यांदा पंप चोरीला गेले. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल होताच डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली.

तेजस सतीश यावलकर (रा.वाणी गल्ली, यावल) यांच्या यावल शिवारातील शेतात (गट क्र.१४७०) विहीर आहे. या विहिरीत त्यांनी टेक्स्मो कंपनीच्या १० एचपीच्या दोन मोटारी बसवल्या होत्या. बुधवारी सकाळी मजुराला हे दोन्ही पंप चोरीला गेल्याचे लक्षात आले. या मुद्देमालाची किंमत २४ हजार रूपये आहे. याप्रकरणी तेजस यावलकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करत आहे. दरम्यान, २८ फेब्रुबारीच्या रात्री यावलकर यांच्या याच शेतीलगतच्या गोपाळ कोळी यांचे गटातील विहिरीतून दहा व साडेसात अश्वशक्तीचे ८० हजार रूपये किमतीचे दोन पंप चोरी झाले होते. याप्रकरणी दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...